धाराशिव  (प्रतिनिधी) - गट शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तिसरा क्रमांक पटकावलेल्या पिंपरी (बे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा  ग्रामस्थांच्यावतीने दि.१२ मार्च रोजी सत्कार करण्यात आला.

धाराशिव तालुक्यातील चिलवडी येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण बीट शिक्षण विभाग अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्वान व प्रयोगशील महिला शिक्षकांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील, गट शिक्षण अधिकारी असरार सय्यद, पोलीस उपनिरीक्षक अनघा गोडगे, चिलवडीच्या सरपंच रोहिणीताई जाधव, उपसरपंच सुप्रिया जगताप आदी उपस्थित होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात पिंपरी (बे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान गट व मोठा गटातील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल दोन्ही संघाचा पिंपरी ग्रामस्थांच्यावतीने पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महेश अनपट, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर, उपाध्यक्ष आसिफ शेख, निलावती बामणे, उमेश माळी, प्रशांत कोळी, नागेश माळी, पांडुरंग करवर, बालाजी पाटील, सलीम पठाण, मदतनीस छोटीबी पठाण, शिक्षक एच.आर. डोलारे, ए.आर. देडे, ए.एम. गव्हाणे, एस.एस. दिवसे, एस‌.ए. निलंगेकर, पी.एस. सोनवणे, सी.डी. लांडगे आदी उपस्थित होते.

 
Top