कळंब (प्रतिनिधी)- येथील बस आगारात दि. 16 मार्च रोजी तुकाराम बीज च्या शुभमुहूर्तावर कळंब आगारातील दत्त मंदिरात येडशी, तडवळा, गौर, दहिफळ फेऱ्या करणाऱ्या चालक वाहक  ग्रुप च्या एस. टी .कर्मचारी बांधवांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम घेऊन महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कळंब आगारातील सर्व एस. टी. कर्मचारी आणि प्रवाशी मोठ्या संख्येने  या कार्यक्रमासाठी हजर होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येडशी, तडवळा, गौर, दहिफळ ग्रुप च्या सर्व एस .टि .कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता ही महाप्रसाधाने करण्यात आली.


 
Top