नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहरवाशीयांकडून नळदुर्गचे हुतात्मा बाबुराव बोरगावकर, व हुतात्मा निलय्या स्वामी यांना आभिवादन करुन त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. दरम्यान हुतात्मा दिना निमीत्त दिवसभर शहरातील बाजारपेठ बंद ठेवून हुतात्म्यांना व्यापारी वर्गांनी आदरांजली वाहीली.
येथील चावडी चौकात हुतात्मा बाबुराव बोरगावकर, हुतात्मा निलय्या स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन हुतात्मा पुत्र बाबुराव स्वामी गुरुजी यांच्या हस्ते पूजन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.तर हुतात्मा स्मारका मध्ये हुतात्मा बाबुराव बोरगावकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन काँग्रेसच्या सुभद्राताई मुळे व सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी वऱ्हाडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे, शाहुराज पाटील, माजी नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अहंकारी, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पूदाले, मुकुंद नाईक, सुभाष कोरे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठठल जाधव, रघुनाथ नागणे, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, उत्तम बनजगोळे, खंडेशाप्पा कोरे, माजी नगरसेवक तथा ग्राममहसुल अधिकारी महालिंग स्वामी, दयानंद स्वामी, दिशा नागरी सहकारी पतसंस्थेचे शाखाधिकारी उमेश जाधव, माजी नगरसेवक दत्तात्रेय कोरे, सुहास पाटील, नवल जाधव, आप्पी स्वामी, अण्णाराव जाधव, पप्पू पाटील, बेडगे, कल्पना गायकवाड, वाघमारे आदी सह बहुसंख्य नागरीक उपस्थीत होते.