धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी देविदास पाठक यांची निवड झाल्याबद्दल फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत करण्यात आला.
प्रथमता,तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शाल पुष्पगुच्छ व पेढे भरवुन देविदास पाठक यांना सन्मानित करण्यात आले. सिनेट सदस्य,पर्यटन जनजागृती संस्थेचे सचिव,एक अभ्यासु पत्रकार यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे देविदास पाठक यांचा समितीच्या वतीने सत्कार करतांना पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे, अब्दुल लतिफ, गणेश वाघमारे, बाबासाहेब गुळीग, अंकुश उबाळे, धनंजय वाघमारे, संजय गजधने, प्रविण जगताप, बलभीम कांबळे, पुष्पकांत माळाळे, संपतराव शिंदे, रविंद्र शिंदे, डॉ.रमेश कांबळे, अतुल लष्करे, आदिनाथ सरवदे, श्रीकांत गायकवाड, कैलास शिंदे, स्वराज जानराव आदी उपस्थित होते. सत्कार केल्याबद्दल देविदास पाठक यांनी समितीचे आभार व्यक्त केले.