धाराशिव (प्रतिनिधी)-  बँकिंग क्षेत्रातील संधी, होत असणारे बदल, भविष्यातील अडथळे या बाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले. बँकिंग क्षेत्रातील बद्दल हे सर्व सामान्यांच्या रोजच्या जीवनात परिणाम करत असतात. तसेच पैशाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ही सिस्टम समाजासाठी महत्वाची आहे. बँकिंग क्षेत्रातील बदल स्वीकारून कौशल्य आत्मसात करावे. असे मत बँकींग क्षेत्रातील तज्ञ लोकांनी मांडले.   

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभागाने “ विद्यापीठ - उद्योग समिट 2025“ या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 8 मार्च 2025 रोजी केले गेले. यामध्ये उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यांना आमंत्रित करून शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील बदल याबाबत चर्चा घडवून आणली गेली. यावर्षी विभागामार्फत बँकिंग ही थीम ठेवण्यात आली होती. बँकिंग क्षेत्रातील प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी उपव्यवस्थापक कमलाकर नागटिळक आणि कॅनरा बँकेचे अधिकारी  नितीन माधवानी, व्यवस्थापन शास्त्र विभाग संचालक डॉ. सुयोग अमृतराव आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. सचिन बस्सैये उपस्थिती होते. 

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. सचिन बस्सैये यांनी केली. तसेच विभागाची माहिती आणि प्रवास डॉ. सुयोग अमृतराव यांनी मांडला. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात “ओपन प्रश्न उत्तरे“ घेण्यात आली. यातून विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि पाहुण्यांची उत्तरे चांगल्या पद्धतीने झाली. यात विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर व्यवसाय उद्योग साठी प्रस्ताव तयार करणे आणि कागदपत्र बाबत चर्चा झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुप्रिया सुकाळे आणि आभार डॉ. विक्रम शिंदे यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्रा. वरुण कळसे, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थिती होते.

 
Top