धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 08 मार्च रोजी पोहनेर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सदर जागतिक दिनानिमित्त गावामध्ये नकाशा काढण्यात आला तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमचे पुजन करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र पोहनेर तर्फे महिलांना आरोग्य विषयी माहीती देण्यात आली, तसेच महिलांचे तळयात मळयात, संगीत खुर्ची असे विविध खेळ घेण्यात आले.

यावेळी पोहनेर येथील ग्रामपंचायत अधिकारी शिंदे मॅडम, सरपंच उपासना धावारे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बिराजदार मॅडम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर जाधव मॅडम, आशा सुपरवायझर चौरे मॅडम,आशा वर्कर शबाना शेख, सी.आर.पी. स्वाती मोरे, ग्रामसंघ अध्यक्ष सचिव गटातील सर्व सदस्य उपस्थित होते.

 
Top