भूम (प्रतिनिधी)- आठवडी बाजारात आईच्या स्मरणार्थ पाणपोईची सुरवात करण्यात आली. पाणपोई चंद्रमणी भाऊ गायकवाड यांच्या आई स्व. विमल गोरख गायकवाड यांच्या आदर्श आणि स्मरणार्थ सुरु करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून नियमितपणे या पाणपोईची सेवा सुरू आहे. आठवडी बाजारात तालुक्यातील  नागरिक, माहिला, मुले बाजारात येत असतात. आठवडी बाजारात कोणतीही पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे नागरिक पाण्यासाठी तहाणलेले असत हेच ओळखून पत्रकार चंद्रमणी गायकवाड यांनी स्वखर्चातून आईच्या नावाने थंड जारचे पाणी आठवडी बाजारात पानपोईच्या माध्यमातून नागरिक व माहिला भगिनींना उपलब्ध करुन दिले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांना थंड पाणी मिळत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी स्थानिक समुदायाचे विविध प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

 यावेळी चंद्रमणी भाऊ गायकवाड, माजी नगरसेवक रुपेश आप्पा शेंडगे, युवा नेते आबासाहेब मस्कर, उद्योजक बच्चन शेठ गायकवाड, माजी नगरसेवक संतोष सुपेकर, संभाजी गरड, महेंद्र गायकवाड, तानाजी सुपेकर, अजित बागडे, आनंद शिंदे, कदू जानराव, सुमित बाराते आणि अनेक नागरिक उपस्थित होते.


 
Top