धाराशिव (प्रतिनिधी)-  तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिव येथे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रोग्रॅमिंग भाषांवर विशेष अतिथी व्याख्यान व हँड्स-ऑन प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 03 मार्च 2025 ते 7 मार्च 2025 या दरम्यान करण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांना एच टीम एम एल ,सी एस एस , जावा स्क्रिप्ट,रिॲक्ट जे.एस, पी एच पी , पायथॉन, यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांवर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी स्वतः कोडींग करावी म्हणून महाविद्यालयाच्या वतीने लॅपटॉप वर विद्यार्थ्यांकडून आयटी क्षेत्रात सुरू असलेल्या नवीन तंत्रज्ञानावर मिनी प्रोजेक्ट करून घेतले.

प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी डिजिटल घड्याळ, विविध प्रकारचे गेम्स, लहान वेबसाईट्स, मोबाईल डेव्हलपमेंट तयार करून त्या प्रकाशित केल्या. बदलत्या औद्योगिक गरजांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

आजच्या आयटी क्षेत्रातील स्पर्धेच्या युगामध्ये टीसीएस, इन्फोसिस, कॅपजमिनी, रिलायन्स जिओ, आयबीएम यासारख्या अनेक नामांकित कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची निवड होण्यासाठी व सर्वोत्तम पॅकेज मिळण्यासाठी प्रोग्रामिंग व कोडिंग हे स्किल असणे अनिवार्य आहे त्यामुळे  प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासूनच या तंत्रज्ञानामध्ये आवड निर्माण व्हावी त्यामुळे तेरणा कॉलेजने पहिल्या वर्षापासूनच उद्योगमान्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला असून, भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांनी केले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगतात अधिक संधी उपलब्ध होतील व त्यांचा भविष्यकालीन करिअर मजबूत होईल असा आम्हाला विश्वास आहे.

हे प्रशिक्षण  ऑर्डर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक श्री सुरज शिंदे यांनी शंभरहून अधिक प्रशिक्षण दिले. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी बेसिक सायन्स व ह्युमुलिटीज विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.उषा वडणे, प्रा.बी एस चव्हाण, प्रा. अनिरुद्ध देशपांडे,प्रा.ए.डी.बोरकर,प्रा एम.व्ही जोशी, प्रा.पी.एस.तांबारे, प्रा. पाटील व्ही.डी, एस एन नेपते, मंगेश धावारे यांनी प्रयत्न केले.


 
Top