भूम (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, पोलीस नाईक अतिष सारफळे यांनी 8 मार्च रोजी ईट येथील पी. एम.श्री.आदर्श जिल्हा परिषद प्रशालेत  स्टूडंट पोलीस कॅडेट अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्यास 25 हजार रूपये दंड व तीन वर्ष सश्रम कारावासची शिक्षा होत असल्याबाबत पोलीस उपनिरीक्षक ईकबाल सय्यद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच वाहन न चालवण्याबाबत आवाहन घरातील थोर मंडळी तुम्हाला दैनंदिन कामासाठी, शाळा, कोचिंग क्लासेस जाण्यासाठी वाहनाचा वापर तुम्ही तुमचे 18 वर्षे पूर्ण झालेले नसताना व वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वाहने चालवतात. तसेच तुमचे पालक सदर वाहन चालविण्यास देतात ही बाब संपूर्ण पुणे बेजबाबदारपणाची व बेकायदेशीर आहे. अल्पवयीन मुलांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पालकांना किंवा वाहन मालकांना दोषी धरले जाणार आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायदा, ज्युवेनाईल जस्टीस क्ट अशा विविध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील. अल्पवयीन मुलांनी 50 सीसी पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविल्यास त्यासाठी आकारण्यात येणारा दंड 25 हजार रूपये आहे. तसेच मालक व पालकांना 3 वर्षे पर्यंत सश्रम कारावासच्या शिक्षेची तरतूद आहे. अपघात झाल्यास इन्शुरन्स कंपनी कडुन क्लेम नाकारला जातो व वयाच्या 25वर्षापर्यंत संबंधित मुलांना वाहन चालविण्याचा परवाना मिळणार नाही व वाहन नोंदणी रद्द होते. नौकरी, पासपोर्ट मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात. तरी मुलांनी वाहन चालवून स्वतःचा व दुसऱ्याचा जिव धोक्यात घालू नका.वाहना ऐवजी सायकल, ईसायकलचा पर्याय उपलब्ध आहे.यावेळी शालेय समिती अध्यक्ष सोमेश्वर स्वामी, मुख्याध्यापक जयराम कचरे, पांडुरंग कवडे, लक्ष्मीकांत चव्हाण,अश्विनी चेडे, संगीता कुलकर्णी, गिरीजा गिरी,विद्यार्थी,  उपस्थित होते.सूत्रसंचालन सहदेव हुंबे यांनी केले आभार गाडे यांनी मानले.

 
Top