भूम (प्रतिनिधी)- बऱ्हाणपूर येथे जागतिक महिला दिन व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकनाथ हिरक 60 महोत्सव निमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन, सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव, साई संजीवनी हॉस्पिटल बार्शी,यांच्या संयुक्त विद्यमानाने  महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, सल्ला व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. 

शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री धाराशिव प्रताप सरनाईक,माजी मंत्री विद्यमान आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, उपाध्यक्ष धनंजय सावंत, कक्षप्रमुख मंगेश चिवटे ,राज्यप्रमुख रामहरी राऊत,युवासेना राज्य समन्वयक नितीन लांडगे, वैद्यकीय मदत अधिकारी रवींद्र अनभुले,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्कप्रमुख सचिन मांजरे पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख पांडुरंग धस यांच्या सहकार्यने सदर शिबिरामध्ये महिलांचे विविध आजार, दंत तपासणी, वेलस्कोप द्वारे कॅन्सर तपासणी, हृदयरोग,मधुमेह, नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप,औषध वाटप, करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ सुजित नायकल,डॉ विशाखा वाघमारे वैद्यकीय अधिकारी,डॉ. अमोल कुटे दंत रोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल शिनगारे,डॉ.मारुती पोत्रे वैद्यकीय अधिकारी,बी एन घेम्बाड नेत्र चिकित्सा अधिकारी, मनीषा अंधोरे एन एन एम,गोकर्ण शिरसागर, सूर्यकांत तटाळे समुपदेशन, गपाट औषध निर्माता लेकुरवाळे आरोग्य सेवक, दसे सदानंद आरोग्य सहाय्यक समुदाय नागरगोजे गणेश वैद्यकीय अधिकारी,गायकवाड एम एस आरोग्य सेविका,साळुंखे अभिजीत या तज्ञ डॉक्टर साहाय्याने तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख पांडुरंग धस यांच्या हस्ते झाले.

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, आणि वेळच्या वेळी तपासणी केल्यास अनेक आरोग्याच्या समस्या टाळता येतात असे मत वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुजित नायकल  यांनी मांडले.

महिला सशक्तिकरण व आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे चा वतीने घेण्यात आले.  याप्रसंगी  माजी सरपंच मनीषा घाडगे पाटील, आशा सेविका मीना दरेकर, भाग्यश्री वारे, विजया धस, जयश्री घाडगे, निलावती वारे,संगीता करडे, चंद्रकला वारे, माजी सरपंच विलास पाटील, माजी उपसरपंच सतीश वारे, शिवसेना बूथप्रमुख बालाजी वारे, अजित पाटील,गावातील नागरिक युवती मोठ्या संख्येने शिबिरास उपस्थित होते.

 
Top