तुळजापूर (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी राञी भूम तालुक्यातील पारा येथील रॉयल क्रिकेट संघ व तुळजापूर शहरातील एन डी बॉईज यांच्यामध्ये होवुन यात रॉयल क्रिकेट संघ पारा यांनी विजय मिळवत दोन लाख 51 हजार बक्षिस पटकावले. तर ग्रामीण गटामध्ये श्री गणेशा क्रिकेट क्लब अनसुरुडा त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर तालुक्यातील छत्रपती क्रिकेट क्लब चिंचोली उपविजेता राहिला. विजेत्या संघास भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, संतोष बोबडे, आनंद कंदले, नरेश अमृतराव, विजय गंगणे, अमर हंगरगेकर, विहान गंगणे, पुजा गंगणे, आरती गंगणे, विजय कंदले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी आलेल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा लकी ड्रॉ ठेवला होता. त्यामधून लकी प्रेक्षकांना फ्रिज, कूलर, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही आदी बक्षिसाचे वाटप करण्यात आले. शहरी गटासाठी या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये तिसऱ्या नंबर वर एके अकॅडमी तुळजापूर तर चौथ्या क्रमांकावर दयावान रायडर्स हे संघ राहिले. या स्पर्धेसाठी नागरिकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. फायनल सामना पाहण्यासाठी हजारो नागरिक यावेळी सामन्याचा आनंद घेताना दिसून आले. माजी सभापती विजय गंगणे मित्रमंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रत्नदीप भोसले, लखन पेंदे, निलेश रोचकरी, मनोज गवळी, प्रिया गंगणे, पूजा गंगणे, विहान गंगणे यांच्यासह विजय गंगणे मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.