तुळजापूर (प्रतिनिधी)-  स्वराज्य  संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे  ऐतिहासिक, मौल्यावान दागिने  चोरीला

जाऊन गायब होणे, गहाळ होणे यावर शासन कोणतेच ठोस पावले उचलत नाही. हे देवी तुळजाभवानीवर अन्याय होत असताना शासन त्याकडे लक्ष देत नाही.तरी आपण  जातीने लक्ष घालुन तात्काळ आदेश देऊन सदरच्या प्रकरणात आपण सी.बी.आय या संस्थेकडे तपास देण्याचे मागणी पुजारी मंडळ माजी अध्यक्ष किशोर गंगणे व अँड शिरीष कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देवुन केली आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मौल्यवान व अतिप्राचीन दागदागिणे व इतर मौल्यवान वस्तु गहाळ व त्याचा भ्रष्टाचार प्रकरणी आवाज उठवुन ही शासन या बाबतीत योग्य दिशेने पावले उचलत नाही. सदरचे प्रकरण अत्यंत संवेदनशील व भाविकांच्या भावनेशी गुंतलेले आहे.  आपण या विषयात सी.आय.डी. चौकशी करण्याचे सुतोवाच विधानसभेमध्ये केला. परंतु सी.आय.डी. या संस्थेने अद्याप पावेतो कोणतेही योग्य काम या प्रकरणात केलेले नाही.

सदरच्या घोटाळ्या बद्दल आम्ही उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे ही रिट पिटीशन दाखल केलेले होते. त्यामध्ये अनेक ठेकेदार अधिकारी, कर्मचारी, अतिउच्च अधिकारी यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर योग्य दिशेने तपास करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपत्री संभाजीनगर येथे अवमान याचिकाही दाखल केलेली आहे. त्यामध्येही चौकशी होऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहे.

जिल्हाधिकारी यांनी स्थापन केलेल्या वाहिक दान याची मोजदाद करण्याकरिता समिती स्थापन केली. दागिण्यांची मोजदाद करत असताना अनेक मौल्यवान वस्तु गायब झाल्याचे निष्पन्न झालेले असताना नियुक्त समितीने योग्य असे काम केलेले नाही.   या प्रकरणी शासनाने कोणतेही पाऊल तात्काळ उचलले नाही. तर आम्हास जनअंदोलन उभे करावे लागेल व नंतर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील याची आपण दखल घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.

 
Top