तुळजापूर (प्रतिनिधी)- लातूर - महामार्ग वर पवन चक्कीच्या नावाखाली तुळजापूर तालुक्यातील परिसरातील लाखो ब्रास गौण खनिजाची मोठया प्रमाणात लुट होत असल्या बाबतीत तहसिल कार्यालय तुळजापूर (वसुली/गौण खनिज विभाग) ने घेतली असुन उत्तखन्नना बाबत वस्तुस्थिती अहवाल या कार्यालयास सादर करावा असे आदेश सहाय्यक महसुल अधिकारी बी. डी. चामे यांनी यांनी ग्राम महसुल अधिकारी वडगाव लाख यांना काढला आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, श्रीकृष्ण सुर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजीत पवार) गट यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. या बाबतीत वृत्त विविध दैनिकात प्रसिध्द झाले होते. सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त असणा-या कार्यक्षेत्राअंतर्गत पवन चक्कीसाठी करण्यात आलेले व चालु असलेले उत्खनन, देण्यात आलेल्या परवानगी नुसार होत आहे किंवा अतिरीक्त उत्खनन झाले आहे. या बाबतचा तक्रारीच्या अनुषंगाने प्रकाशीत बातमिची प्रत सोबत देण्यात येत असुन उत्तखन्ननाबाबत वस्तुस्थिती अहवाल या कार्यालयास सादर करावा असे नोटीसीत म्हटले आहे.