कळंब (प्रतिनिधी)-  आजच्या विज्ञान युगामध्ये महिलांनी शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे . त्याचबरोबर शिक्षणासोबतच कायद्याचे शिक्षण ही महिलांनी अधिक प्रमाणात घेणे ही एक महत्त्वाची गरज बनली आहे .  असे मत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात न्यायाधीश श्रीमती ए.सी .जोशी यांनी बोलताना व्यक्त केले . 

कळंब तालुका विधी सेवा समिती कळंब विधीज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विधी साक्षरता शिबिराचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात दि . ८ मार्च रोजी आयोजित केले होते .  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यायाधीश श्रीमती ए.सी . जोशी या होत्या तर  यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर न्यायाधीश श्रीमती अमृता जाधव विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष बी .बी . साठे जेष्ठविधीज्ञ  त्रिंबक मणिगिरे हे उपस्थित होते .

यावेळी त्यांना जोशी पुढे म्हणाल्या की महिलांसाठी   शासनाने कायदे  बनवले आहेत त्याचा उपयोग महिलांनी त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी व अत्याचाराला बळी न पडता त्यावर न्याय मिळवण्यासाठी या कायद्याचा उपयोग करावा असेही जोशी यांनी आपले मत मांडले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड . एस . आर . आगलावे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड . बी .बी .साठे यांनी उपस्थितांचे मानले या कार्यक्रमासाठी  महिला  मोठ्या संख्येने या कार्यक्रमांसाठी हजर  होते .

 
Top