धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील महायुती सरकारने पुरोगामी महाराष्ट्रात जातीय विद्वेष पसरवला आहे. प्रत्येकाच्ा मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. असा आरोप काँग्रेसचे अखिल भारतीय सचिव कुणाल चौधरी यांनी केला.
काँग्रेसच्या वतीने मस्साजोग ते बीड यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रे संदर्भात माहिती देण्यासाठी पक्षाच्यावतीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी प्रदेश सचिव अभय साळुंखे, राहुल वर्धा, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आदी उपस्थित होते. चौधरी म्हणाले की, सरकारमधील मंत्री व नेत्यांनी समाजात दुहीची बिजे पेरली. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या जातीय विद्वेषाला समुळ नष्ट करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रेत धाराशिवमधून एक हजार कार्यकर्ते दोन दिवस सहभागी होतील. यात्रेच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार आहोत. चौधरी म्हणाले की, महायुती सरकार मस्साजोगचे सरपंच देशमुख यांचा हत्येतील गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. दोषारोपत्र दाखल केल्यानंतर अनेक विदारक सत्य समोर आले. हेस र्व पुरावे जवळ असताना गुन्हे दाखल करणे व आरोपींना पकडण्यासाठी खुप वेळ लागला. माजी मंत्री धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.