धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धाराशिव तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना एमआयडीसी परिसरात तुम्ही शिवजयंती साजरी का केली, असे विचारात समाजकंटकांनी मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर योग्य कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ व घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शेख कुटुंबीय छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसले होते.

याबद्दल माहिती मिळताच शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद नगर पोलिस ठाणे गाठून याबात पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला. समितीच्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून आनंदनगर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करून अटक करण्याची हमी पदाधिकाऱ्यांना दिली. दरम्यान शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शेख कुटूंबियांची भेट घेत सांत्वन केले. यानंतर आनंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आरोपींवर  गुन्हा का दाखल केला नाही असा जाब विचारत कारवाईचे निवेदन दिले. समितीच्या आक्रमक भूमिकेनंतर आनंदनगर पोलिसांनी संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी पोलिसांनी शेख कुटूंबियांना पोलिसांकडून योग्य सहकार्य व संरक्षण मिळेल असे सांगितले.

 
Top