धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषदेच्या शहर उपजिविका आराखडा कृती समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड झाल्याबद्दल नर्सेस फेडरेशनच्या वतीने

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सत्कार करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ,अधिक्षक डॉ ईस्माईल मुल्ला, नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा संगिता फड यांच्या हस्ते शाल,पुष्प बुके व पेढे भरवुन सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,वैद्यकीय अधीक्षक डॉ तानाजी लाकाळ, अधिक्षक डॉ.ईस्माईल मुल्ला,नेत्र तज्ञ डॉ.बाळासाहेब घाडगे, आरोग्य मित्र शेख रौफ,नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा संगिता फड,अधिपरिचारिका शंकुतला जाधव,मेट्रन चव्हाण,सुवर्णा देशमुख,ब्रदर छत्रपाल वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ जानराव,संदिप सरफाळे, श्रीकांत गायकवाड,अभिजीत बिते सह इतर उपस्थित होते.सत्कार केल्या बद्दल गणेश रानबा वाघमारे यांनी आभार मानले.

 
Top