तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील ड्रग्स  रॅकेट प्रकरणी  पोलिसांनी कारवाई करत अजून दोघांना ताब्यात घेतले आहे. सुलतान शेख रा. पुणे व जीवन साळुंखे रा. सोलापूर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.  यांना सोमवारी न्यायालया समोर उभे केले असता 5 एप्रिल पर्यत 13 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान आता ह्या प्रकरणातील संशयित आरोपींची संख्या अठरा वर पोहोचली असून यामधील 12 जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन जण फरार असून चार जणांची नावे अद्यापही गोपनीय ठेवण्यात आली आहेत. तुळजापूर येथे विक्रीसाठी येणारे ड्रग्स तामलवाडी येथे पकडल्यानंतर पहिल्यांदा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तुळजापूर शहरात हा धंदा गेली अनेक वर्ष सुरु असल्याचे बोलले जात होते. दरम्यान या प्रकरणी पालकमंत्री प्रताप सरनाईक व आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी आक्रमक भुमिका घेत कोणाचीही गय करु नका असे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी जोरदार तपास सुरू केला होता. दरम्यान या प्रकरणात यापुर्वी मुंबई कनेक्शन समोर आले होते. आता या दोन संशयीत आरोपींच्या अटकेने सोलापूर व पुणे कनेक्शन देखील समोर आले आहे. दरम्यान अजून काही जण सहभागी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी  सुलतान शेख याला रविवारी ताब्यात घेतले असून जीवन साळुंखे या सोमवारी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणातील यापूर्वीच्या दहा आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. तसेच मुंबईतील संशयित महिला आरोपी संगिता गोळे  हिची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख त्यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी  पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे करत आहेत.


चार गोपनीय कोण ?

या प्रकरणात पोलिसांनी चार जणांची नावे गोपनीय ठेवली आहेत. विशेष म्हणजे पोलिस डायरीत ही नावे लिहिली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते चार जण कोण याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु असून, शहरातील अनेकजण नॉटरिचबल असल्याचे बोलले जात आहे.

 
Top