तुळजापूर (प्रतिनिधी) -श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर मधील संगणक व इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार विभागातील विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी तसेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधील विविध संधी व त्या परीक्षेसाठी कशी तयारी करावी यासाठी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी (एनआईसी ) श्री अंकित सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणक विभाग प्रमुख प्रा. वाघमारे डी जे. यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विश्वास पतंगे यांनी केले यावेळी प्रा, शेख , प्रा. भोजने प्रा . रणखांब हे उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता नितीन कुलकर्णी, व महेश नवगिरे यांनी प्रयत्न केले, या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.