उमरगा (प्रतिनिधी)- नागपूर येथील घटनेची धग अद्याप संपली नसतानाच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे औरंगजेब यांचा फोटो व्हाट्सअप स्टेटस वर ठेवण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे या घटनेमुळे हिंदू संघटना आक्रमक झाले असून उमरगा लातूर महामार्गावर नारंगवाडी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प राहिली. आंदोलकांनी समाजकंटकाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. या परिस्थितीमुळे उमरगा शहरात त्यांना वाढला असून पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला आहे उमरगा उपविभागीय अधिकारी (DYSP) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिंदू संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यानीं आरोपीच्या अटकेची मागणी केली . दरम्यान पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगलीआहे. रास्ता रोको आंदोलन तीन तासानंतर मागे घेण्यात आले असले तरी तणाव कायम आहे. परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवण्याचे आव्हान करण्यात आले आहे.