मुरुम (प्रतिनीधी)- उमरगा येथील श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दि.21 मार्च 2025  रोजी महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ संजय अस्वले होते. कॅडेट प्रशांत राम नागदे यांचा भारतीय सैन्यदलात मद्रास रेजिमेंट मध्ये अग्निवीर म्हणुन भरती झाल्या बदल अभिनंदन व सत्कार करण्यात आला. 

त्याचे मुळ गाव घोटाळा ता . बस्वकल्याण कर्नाटक वडिल शेतकरी अत्यंत गरिब , हालाकिच्या परिस्थितुन  प्रशांतला शिक्षण दिले . व  महाविद्यालयाच्या एनसीसी विभागात प्रवेश घेण्यास सांगितले त्याने या संधीचे सोन केल. प्रशांतने गुलबर्गा मॅरेथॉन स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्राप्त केला . शाळा ,महाविद्यालयात सुद्धा त्याने मैदानी धावणे स्पर्धेत विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धे पर्यंत यश संपादन केले .  स्वतःच्या स्वबळावर जिद्य , मेहनत, कठिण परिश्रम , आत्मविश्वासाच्या बळावर त्यांने हे यश संपादन केले . त्याबदल  प्राचार्य अस्वले यांनी त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या . कॅडेटसनी प्रशांतचा आदर्श समोर ठेऊन आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास साधावा, वेगवेगळ्या पदावर जाऊन आपले नावलौकिक सिद्ध करून दाखवावे असे यावेळी त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी डॉ.पद्माकर पिटले , गुंडाजीबापू मोरे ,नितीन कोराळे , विशाल कानेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  प्रास्ताविक कॅप्टन डॉ  ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ गिरीधर सोमवंशी यांनी तर आभार कॅडेट ओमकार वाघमोडे यांनी मानले.  या कार्यक्रमाला प्राध्यापक, प्राध्यापिका एनसीसी कॅडेट व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top