धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने धाराशिव ग्रंथोत्सव 2024 चे आयोजन 24 व 25 मार्च रोजी करण्यात आले आहे.या उत्सवात ग्रंथदिंडी, परिसंवाद,कवी संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन यांसारखे विविध कार्यक्रम होणार आहेत.

सोमवारी, दि.24 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिम्बाळकर, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, राणाजगजीतसिंह पाटील, प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, कैलास पाटील, प्रवीण स्वामी,जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुधा साळुंके,जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती अर्चना नरवडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, सहायक धर्मदाय आयुक्त श्रीमती.आर. आर.कोरे, सहाय्य ग्रंथालय संचालक सुनील हुसे,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व्ही.जी. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

ग्रंथदिंडी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून निघणार आहे.निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते ग्रंथदिंडी पूजन होईल.ग्रंथ दिंडीचे संयोजक हे समर्थ रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्था मेडसिंगाचे संचालक ह.भ.प.ज्ञानेश्वर सूर्यवंशी हे असतील.

वाचन संस्कृती  समस्या,संधी व उपाय या विषयावर दुपारी 12 ते 2 दरम्यान परिसंवाद होणार आहे.अध्यक्षस्थानी डॉ.बालाजी इंगळे हे असतील.यामध्ये बाल साहित्यिक समाधान शिकेतोड,प्रा.श्री.रवी सुरवसे,प्रा.डॉ.आयेशा चिस्ती, एस.एल.पवार हे सहभागी असतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी रावळे ह्या करतील.

दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजता दरम्यान कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे नामांकित गझलकार भागवत घेवारे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून यामध्ये आनंद वीर,संजय धोंगडे,प्रा.अलका सपकाळ, डॉ.संजय सोनटक्के,अश्विनी धाट,मनीषा थडवे,अस्मिता बुरगुटे,शंकर खामकर, कविता पूदाले,शेखर गिरी,युसुफ सय्यद, आश्रुबा कोठावडे,जयश्री तेरकर, विजय गायकवाड,मीना महामुनी,सुवर्णा शिनगारे, सुषमा सांगळे,कृष्णा साळुंखे,रमेश मंमाळे, भूमिपुत्र वाघ, टी.डी.गंगावणे,सोनाली अरडले,संध्याराणी कोल्हे हे कवी सहभागी होतील.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद हंगरगेकर हे करतील.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा  संधी आणि आव्हाने या विषयावर 25 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजतापर्यंत परिसंवाद आयोजित केला आहे.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक श्री.राजेंद्र अत्रे हे असतील.यामध्ये प्रा.प्रशांत चौधरी,प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी व प्रा प्रशांत गुरव हे सहभाग घेतील.

कथाकथन कार्यक्रम 25 मार्च रोजी दुपारी 12 ते 1 वाजतापर्यंत राहील.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुनिता गुंजाळ कवडे ह्या असतील.यामध्ये वसुंधरा गुरव,तनुजा मंजुळे,सुषमा मोरे,सृष्टी कोळी, अनुज कांबळे सहभागी होतील,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.श्याम नवले हे करतील.

धाराशिव जिल्ह्याची प्राचीन ओळख या विषयावर परिसंवादाचे आयोजन दुपारी 3 ते 4 वाजता दरम्यान करण्यात आले असून अध्यक्षस्थानी साहित्यिक,इतिहास व पुरात्व संशोधक युवराज नळे हे अध्यक्षस्थानी असतील.यामध्ये रविंद्र शिंदे व श्री जयराज खोचरे हे सहभागी होतील.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ हे करतील.

ग्रंथ प्रदर्शन व विक्री ही सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत राहील.समारोप समारंभ 25 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बी.एड व आर.पी.कॉलेजचे प्राचार्य डॉ.प्रकाश कांबळे असतील.अध्यक्षस्थानी श्री.नितीन तावडे असतील.सूत्रसंचालन साधना विश्वेश्वर ह्या करतील. धाराशिव ग्रंथोत्सव हा वाचनप्रेमी आणि साहित्य रसिकांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरणार असून,नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे व ग्रंथोत्सव समन्वय समितीने केले आहे.


 
Top