धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती सोहळा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी विद्यार्थ्यांन साठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये प्राधान्याने मुलांच्या आणि मुलींच्या क्रिकेट स्पर्धा तसेच महाविद्यालय स्टाफच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेतून निवड झालेल्या विजयी आणि उप विजयी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.
यावेळी विशेष महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना कमेंस स्कॉलरशिप अंतर्गत लॅपटॉप वितरण व शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती साठी कमिंस इंडिया या कंपनीकडून मिळालेले शैक्षणिक शुल्क सदर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकासह लॅपटॉप आणि शुल्क देण्यात आले.
यावेळी बोलताना महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की शिवजयंती ही एकच दिवस साजरा होत असली तरी , विद्यार्थ्यांनी व सर्वांनीच शिवजन्मोत्सव हा प्रत्येक दिवशी आपल्या मनामध्ये साजरा करून शिवरायांनी जो आपल्यासमोर आदर्श घालून दिला त्याचे पालन प्रत्येकानेच केले पाहिजे
यावेळी महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख डॉ. पी एस कोल्हे , अकॅडेमिक डीन डॉ.डी. डी. दाते ,डॉ. यु.के. वडणे प्रा. एस एम पवार, प्रा. पी एम पवार, डॉ. पी टी माने यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. पी एस तांबारे , प्रा पी व्ही कोकाटे प्रा डी बी बोरकर, प्रा आर एम शेख यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या आदर्शांचे आपल्या जीवनामध्ये पालन करण्याचे आवाहन केले .कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरती करून करण्यात आली. त्यानंतर कॉलेजच्या कॅम्पस मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या याप्रसंगी महाविद्यालयातील इंजिनिअरिंग व फार्मसी विभागाचे सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी होऊन शिवसोळा साजरा करण्यात आला.
यावेळी लॅपटॉप प्राप्त झालेले अभियांत्रिकीच्या द्वितीय आणि तृतीय वर्गातील विद्यार्थी अनुक्रमे समीर शेख , इर्शाद पठाण , श्रावण पतंगे , रोहित उंबरे , आदित्य जाधव आणि ऋषिकेश गारोळे यांनी महाविद्यालयाचे या विशेष प्रयत्नाबद्दल आभार मानले. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक लॅपटॉप वितरणाच्या वेळी आपल्या मुलाचे कौतुक करण्यासाठी हजर होते.
लॅपटॉप व बक्षीस मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब, मा. आमदार राणाजगजीतसिंहजी पाटील,मा. मल्हार पाटील, सर्व विश्वस्त , तसेच तेरणा ट्रस्ट चे समन्वय प्रा. गणेश भातलवंडे यांनी अभिनंदन केले.