धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गाची सुधारणा व विसर्जन विहिर ते एचडीएफसी बँकेपर्यंतचा उर्वरीत काँक्रीट रस्ता तत्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी समता गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास 1 एप्रिलपासून विसर्जन विहिरीजवळ आमरण उपोषण करण्याचा इशाराही समता गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन नाना घाटगे यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संदर्भीय दोन्ही कामे तात्काळ सुरू करणेबाबत विनंती केलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत सदरची कामे चालु झालेली नाही. दोन्ही कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून प्रत्यक्षात दोन्ही ठेकेदारांना कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र दोन्ही कामे अर्धवट केलेली आहेत. त्यामुळे समता नगरवासीयांना खड्ड्यामुळे व धुळीमुळे श्वसनाचा त्रास होवून भयंकर आजाराला समोरे जावे लागत आहे. दोन्ही रस्ते रहदारीचे असल्याने हजारो वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य झाल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तरी संबंधीत ठेकेदारास सदरचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश देऊन काम पूर्ण करून घ्यावे अन्यथा समता नगरवासीयांच्या वतीने संतोष (नाना) दत्तात्रय घाटगे स्वतः रखडलेल्या रस्त्यावर विसर्जन विहिरीजवळ 01 एप्रिलपासून आमरण उपोषण करणार आहे. त्यानंतर होणार्‍या परिणामास व माझ्या जीविताची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी, असेही निवेदनात घाटगे यांनी नमूद केले आहे.

यावेळी समता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब घाटगे, सचिव पंकज पडवळ, संचालक वासुदेव वेदपाठक, महेश काटे, प्रशांत वाघ, भीमराव चव्हाण, वसंत पोतदार, उमाकांत आघोर, रामेश्वर टेकाळे, दिलीप मस्के, राजेश बोपलकर, धनंजय बोरावके, धनंजय राठोड, लोमटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top