धाराशिव (प्रतिनिधी)- बिहार राज्यातील बुद्धगया जिल्ह्यातील महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने धरणे आंदोलन दि.5 मार्च रोजी करण्यात आले.

बुद्धगया येथील महाबोधी विहाराचा कारभार बौद्ध ऐवजी ब्राह्मण पाहत आहेत. त्यामुळे बौद्धांवर अन्याय होत असून ते बंद करण्यात यावे. तर बुद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्यात यावा. तसेच बुद्धगया महाबोधी विहार व्यवस्थापन बौद्ध समुहाकडे सोपविण्यात यावे व बौद्ध धार्मिक व्यवहारात राज्य हस्तक्षेप थांबविण्यात यावा या मागणीसाठी महाबोधी विहार येथे सर्व बौद्ध भिक्खू व भंतेजी यांनी दि.12 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून आजचा 22 वा दिवस आहे. त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस विजय अशोक बनसोडे,जिल्हा संघटक ब्रह्मानंद गायकवाड,बाबासाहेब बनसोडे,जिल्हा महिला उपाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे,समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव सचिन दीलपाक,केंद्रीय शिक्षिका मीनाताई लगाडे,बौद्धाचार्य गुणवंत सोनवणे,धाराशिव तालुका सरचिटणीस धनंजय वाघमारे,कोषाध्यक्ष उमाजी गायकवाड,एसएसडीचे उपाध्यक्ष बापू जावळे,उमरगा तालुका अध्यक्ष आनंदकुमार कांबळे,लोहारा तालुकाध्यक्ष तानाजी माटे,तालुका सरचिटणीस दीपक सोनकांबळे,तुळजापूर तालुकाध्यक्ष वैभव शिरसाठ,संकेत दिलपाक,तालुका संघटक धर्मराज कदम,सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोडे,रमाई फाउंडेशनचे,पृथ्वीराज चव्हाण, संविधान संवर्धन कृती समितीचे संजय वाघमारे,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे,राजाभाऊ ओहाळ, सोमनाथ गायकवाड,रंजीत गायकवाड,रंजीत मस्के,युवा भीमसेनेचे महादेव भोसले,ज्येष्ठ साहित्यिक व्ही,एस गायकवाड,ऍड. निलेश प्रधान,पार्वती कांबळे, वच्छलाबाई ओव्हाळ,कल्पना डावरे, विद्याताई वाघमारे,चंद्रकला नन्नवरे, मीरा शिंदे,ऍड.झिनत प्रधान,आबा आवटे आदींसह विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.   आंदोलनास ऑल इंडिया उलेमा बोर्ड धाराशिव,दलित मुस्लिम युनायटेड फ्रंट धाराशिव,वंचित बहुजन आघाडी धाराशिव,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धाराशिव,त्रिरत्न महासंघ धाराशिव,राष्ट्रीय चर्मकार महासंघ धाराशिव इत्यादी अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबासाहेब कांबळे,अक्षय बनसोडे,मुकेश मोटे,सचिन बनसोडे,संतोष कांबळे,वसंत खुणे,शशिकांत सोनवणे,अमोल वाघमारे,अमोल अंकुश यांनी त्याच बरोबर समता सैनिक दलाच्या संकेत दिलपाक,आम्रपाली गोटसुर्वे,रेखा अंकुश भंडारे,नितीन लांडगे यांनी परिश्रम घेतले.

 
Top