परंडा (प्रतिनिधी) - उपजिल्हा रुग्णालयात आज रोजी वैद्यकिय अधिक्षक डॉ.व्ही.डी.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्णबधिरता आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदरील राष्ट्रीय कर्णबधिरता दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा रुग्णालय धाराशिव येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.फुलारी उपस्थित होते. या शिबिरात कान, नाक, घसा याबद्दल माहिती देण्यात आली. वैद्यकिय अधीक्षक डॉ विश्वेश कुलकर्णी यांनी रूग्णांना मार्गदर्शन केले .बार्शी येथील कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर तांबोळी यांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. सदरील शिबिरात पथकातील सर्व कर्मचारी यांनी लहान वयोगटातील 0 ते 18 वर्षाखाली बालकांची तपासणी करण्यासाठी परिश्रम घेतले.शिबिराचे सूत्रसंचालन तानाजी गुंजाळ यांनी केले.उपस्थित रुग्णांना डॉ आनंद मोरे यांनी मार्गदर्शन केले. सदरील शिबिरात रणखांब नागेश,अनिलभोसले, मुस्तफा शेख व कर्मचारी उपस्थित होते.