धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी रॉबर्ट कॉक व धन्वंतरीच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहाण,जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.सतीश हरिदास,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा.डॉ.स्वप्निल सांगळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे ऊरो विभाग प्रमुख डॉ.प्रवीण डुमने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनयशील कुलकर्णी,परिचर्या विद्यालयाचे प्राचार्य श्री.मूजावर,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत बनसोडे,जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन श्रीमती जमादार श्रीमती जाधव, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख,डॉ.सय्यद जिल्हा क्षयरोग केंद्रातील सर्व कर्मचारी,पीपीसीए कर्मचारी,वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थी,परिचर्या महाविद्यालयाच्या श्रीमती शिंदे व तसेच नागरिक उपस्थित होते.

सर्वप्रथम दीप प्रज्वलनानंतर क्षयरोगाविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर परिचर्या विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी pulmonary TB  विषयक पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती करण्यात आली.तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी Extra pulmonary TB पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती केली.पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली व जागतिक क्षयरोग दिनानिमित्त खाजगी वैद्यकीय  व्यवसायिक निरंतर आरोग्य शिक्षण घेण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ.शैलेंद्र चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांच्या हस्ते रांगोळी,पोस्टर्स,पथनाट्य या स्पर्धांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यानंतर अधिष्ठता जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी क्षयरोगाविषयी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तालुकास्तरावर निबंध स्पर्धा घेण्यात आली,शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून रॅली काढण्यात आली,गावातील नागरिकांना क्षयरोग बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.अशा मोठ्या प्रमाणात तालुकास्तरावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्निल सांगळे,सहाय्यक प्राध्यापक वैद्यकीय महाविद्यालय व आभार प्रदर्शन संध्या द्वासे समन्वयक जिल्हा क्षयरोग केंद्र धाराशिव यांनी केले.या वर्षीचे घोषवाक्य -"Yes we can end TB: commit, Invest, Deliver"होय ! आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो : प्रतिज्ञा करा,तरतूद करा, सेवा द्या.असे आहे.

 
Top