धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील येडशी येथे इंडस टॉवर कंपनीच्या टॉवरवरून एअरटेल कंपनीच्या इंटरनेटसाठी वापरण्यात येणारे टिश ॲटेना व अन्य उपकरणे चोरी प्रकरणी धाराशिवच्या गुन्हा शाखेने बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथून इंजिनिअर राजेश आचार्य यासह अटक केली आहे. 

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचे आदेशावरून दिनांक 18 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करीत संशयित आरोपीचा तपास घेतला. तपास आंबेजोगाई तालुक्यातील राजेश आचार्य यांचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत त्याला ताब्यात घेतले. 

तसेच त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली. त्याने तो यापूर्वी रिकाम कंपनीत इंजिनियर म्हणून कामास होता. तसेच नोकरी गेल्यानंतर पैसे कमवण्यासाठी त्याने धाराशिव जिल्ह्यातील येडशी, सांजा, मार्डी आणि मसला या ठिकाणी असलेल्या टॉवरवरील इंटरनेटसाठी वापरण्यात येणारी 300 हून अधिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे चोरल्याची कबूल दिली.  पोलिस तपासादरम्यान आरोपीच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यात आधीच चार गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण 1 लाख 65 हजार रूपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण 2 लाख 35 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


यांचा कारवाईत सहभाग

पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, चालक पोका नितीन भोसले,चालक पोका रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.


 
Top