धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश चिटणीस पदी धाराशिव येथील ओबसी नेत्या डॉ.स्नेहा सोनकाटे यांची ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालयात शनिवार 1 मार्च रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यकारणी बैठकीत डॉ.स्नेहा सोनकाटे यांनी प्रदेश चिटणीस पदी निवड करण्यात आली.
या कार्यकारणी मध्ये एकूण 32 पदाधिकाऱ्यांचा प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश चिटणीस, प्रदेश संघटक, प्रदेश प्रचारक यांचा समावेश आहे. यावेळी मा.खा.समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ ,समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ , प्रदेश सरचिटणीस सत्संग मुंडे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने मला नवीन जबाबदारी मिळाली असून ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी निश्चितच अधिक बळ मिळणार आहे.बहुजन समाजातील सर्व घटकांना न्याय हक्का मिळवून देत या महापुरुषांचे विचार अविरतपणे रुजविण्याचे आपले हे काम अविरत सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया नूतन प्रदेश चिटणीस डॉ.स्नेहा सोनकाटे यांनी दिली.