तुळजापूर (प्रतिनिधी)- प्रसिद्ध सिनेअभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांनी शनिवारी रात्री श्रीतुळजाभवानी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर, सहकारी कुटुंबीय विरेन मोहळकर, प्रतिमा मोहळकर, महेश पटेल, सुभाष बंडके, विठ्ठल देवकर इत्यादी उपस्थित होते.
मंदिर संस्थान तर्फे त्यांचा देवीजींची प्रतिमा व महावस्त्रे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थान चे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, दिनेश निरवळ, मास मीडिया प्रमुख नितीन साके, सुरक्षा निरीक्षक ऋषीकेष पाटील व अन्य कर्मचारी उपस्थित होते.