कळंब (प्रतिनिधी)-  कळंब ते पंढरपूर शिखर शिंगणापूर ही बस सेवा कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी. अशी मागणी शिखर शिंगणापूर महादेव भक्त व पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी भक्त व वारकरी यांनी कळंबा कळंब बस आगार प्रमुख खताळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

या निवेदनात कळंब तालुक्यातून व बाजूच्या केज तालुक्यातून या मार्गावर पंधरवडी एकादशी वारी, मासिक एकादशी वारी, आषाढी एकादशी वारी, माघी एकादशी वारी तसेच नियमित विठ्ठल रुक्मिणी दर्शन व शंभू महादेव शिखर शिंगणापूर दर्शनाला जाणाऱ्या शिवभक्त व विठ्ठल रुक्मिणी भक्तांची व वारकऱ्यांची मोठी संख्या आहे.

कळंब- शिखर शिंगणापूर- पंढरपूर ही गाडी नियमित सुरू केल्यास आपल्या कळंब आगाराला चांगला अर्थिक फायदा होईल.  शिवभक्त व वारकऱ्यांची सोय होईल. यापूर्वी या मार्गे कळंब बस आगाराची बस सेवा होती. परंतु गेल्या अनेक वर्षापासून ही सेवा बंद आहे. या महिन्यात 30 मार्च ते 15 एप्रिल 2025 पर्यंत शिखर शिंगणापूरचे शंभू महादेवाची चैत्री यात्रा सुरू होणार आहे. तरी आपणास सर्व शिवभक्त विठ्ठल रुक्मिणी फक्त वारकरी यांच्यावतीने विनंती करण्यात येते की, आपण दिनांक 25 मार्च 2025  पासून कळंब- पंढरपूर-शिखर शिंगणापूर हे बस सेवा सुरू करावे. जेणेकरून शिवभक्तांची व विठ्ठल भक्तांची वारकऱ्यांची दर्शनाला जाण्याची सोय होईल व आपल्या कळंब आगाराचे उत्पन्नात देखील भरघोस वाढ होईल. तरी आपण निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर हे नियमित व सेवा सुरू कराल ही आपणाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सध्या बस आपल्या कळंब आगाराकडे पुरेशा बसउपलब्ध नसतील तर किमान यात्रा काळात म्हणजेच 25 मार्च 2025 ते 15 एप्रिल 2025 पर्यंत तरी ही बस सेवा सुरू करावी अशी ही विनंती करण्यात आली आहे. 

कळंब तालुक्यातून व बाजूच्या केज तालुक्यातून या मार्गावर पंधरवडी एकादशी वारी, मासिक एकादशी वारी, आषाढी एकादशी वारी, माघी एकादशी वारी तसेच नियमित विठ्ठल रुक्मिणी दर्शन व शंभू महादेव शिखर शिंगणापूर दर्शनाला जाणाऱ्या शिवभक्त व विठ्ठल रुक्मिणी भक्तांची व वारकऱ्यांची मोठी संख्या आहे. निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर हे नियमित व सेवा सुरू अशी आग्रही विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर ॲड. मनोज चोंदे, विलास मुळीक, शंकर करंजकर, ॲड. दिलीपसिंह देशमुख, प्रकाश भडंगे, बंडू ताटे, राजेंद्र करंजकर, शंकर काळे, अशोक शिंदे, ॲड. बी.बी. मिटकरी यांच्या सह्या आहेत.  


 
Top