परंडा (प्रतिनिधी)- आज दि.8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्रम्हगांव या शाळेत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या महिला मेळाव्याला तालुक्यातील ढगपिंपरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विज्ञान पदवीधर शिक्षीका श्रीम.वंदना इंगळे मॅडम,सरणवाडी जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.मुलानी मॅडम,शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व महिला पदाधिकारी ,आशा कार्यकर्ती भोसले मॅडम,गावातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लहु मासाळ यांनी केले. श्रीम. इंगळे मॅडम व उपस्थित महिलांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माॅसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत गीत सादर करून उपस्थित महिला भगिनींचे स्वागत करण्यात आले. श्रीम.इंगळे मॅडम यांनी ""योगासने व प्राणायाम या विषयावर उपस्थित महिलांना खूप अनमोल असे मार्गदर्शन केले.आशा कार्यकर्ती श्रीम.भोसले मॅडम यांनी आरोग्य विषयकवर"" मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीम.सुषमा चव्हाण मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन श्रीम.अपेक्षा ओव्हाळ मॅडम यांनी केले.