धाराशिव (प्रतिनिधी)- आईमुळे मी शिकले. जे विद्यार्थी शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायाला लागले. ते विद्यार्थी आजही कुठ भेटले तरी चर्चा करतात. परंतु जे विद्यार्थी शिकले नाहीत त्यांचे भेट जरी झाले तरी ते दूरून जातात त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे फक्त नोकरीच्याच मागे न धावता व्यवसाय उद्योग उभा करावे, असे मत सौ. जयश्री भोसले यांनी व्यक्त केले.
धाराशिव प्रशालेत शनिवारी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यो बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापक पंडित जाधव, सुवर्णा सोनवणे,दिपाली रोकडे, गौरी माने, झिनत पठाण, निलावती झोरे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मुख्याध्यापक पंडित जाधव यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व विशद करताना देशासह जगभरात नावलौकीक मिळविलेल्या थोर महिलांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. तसेच जगभरात स्वकर्तृत्त्वाने पुढे आलेल्या महिलांचा आदर्श विद्यार्थिनीनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.शाळेतील विद्यार्थीनिंनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई यांचे शिक्षणाबद्दलचे महत्व सांगितले. तसेच प्रशालेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकणारी नाटिका देखील यावेळी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नंदकुमार रणदिवे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.