धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे तसेच आजी, माजी संचालक यांनी केशेगाव गटातील बामणी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 2025 ही बिनविरोध झाल्याबद्दल सर्व शेतकरी सभासद व हितचिंतकाचे आभार मानले.

सुरुवातीला श्री क्षेत्र बामणी येथील जागृत देवस्थान हनुमान मंदिरात नवनियुक्त संचालक मंडळाच्या  शुभहस्ते श्रीफळ वाढविण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सुरुवातीला कारखान्याचे संचालक ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी सर्व शेतकरी सभासद बंधूंना नवनियुक्त संचालक मंडळाची ओळख करून दिली. नंतर कारखान्याचे संचालक काकासाहेब केदार यांनी प्रास्ताविक व्यक्त केले. नंतर संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा सभासद हितचिंतक यांच्यासमोर मांडून कारखान्याच्या वाटचालीमध्ये सर्वांचे सहकार्य सुरुवातीपासून राहिले. तसेच ही निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सर्व सभासद, हितचिंतकाचे आभार व्यक्त केले. नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष बामणीचे सरपंच शेळके यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

 
Top