तुळजापूर - तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात हुताशनी पोर्णिमा दिनी गुरुवार दि. 13 मार्च रोजी श्रीतुळजाभवानी मंदीरात प्रथम सांयकाळी होळी सण पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आले. नंतर होमकुंडा समोर असणाऱ्या होळी नैवध दाखवुन नंतर होळी प्रज्वलित करण्यात आली. नंतर तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील होळ्या प्रज्वलित करण्यात आल्या.

होळी सण पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेस भाविकांचे दहीदुध अभिषेक करण्यात आल्या. आठ वाजता आरती धुपारती करण्यात आल्या. नंतर मंदीरातील होळी प्रज्वलित करण्यात आली. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ भागातील मानाची होळीवरची होळी सिध्द गरीबनाथ दशावतार मठाचे मठाधिपतीमहंत मावजीनाथ बुवांचा हस्ते प्रज्वलित करण्यात आली. शहरातील विविध मंदीरे चौकाचौकात होळ्या रचुन त्या प्रज्वलित करण्यात आल्या.

शुक्रवार धुळवड साजरी करण्यात आली. बच्चे कंपनीने होळीतील राखेचा मातीचे लाडु तयार करुन ऐकमेकांना मारुन धुळवड साजरी केली .धुळवड पासुन रंग खेळण्यास आरंभ झाला. याची सांगता बुधवारी रंगपंचमी दिनी रंग खेळुन होणार आहे.

 
Top