धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस ठाणे आंबी, ता. भुम, जि. धाराशिव येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला एकुण 5,98,699 किंमतीचा देशी, विदेशी दारुचा मुद्देमाल दिनांक 19.03.2025 रोजी रितसर नाश करण्यात आला आहे. मा. मुख्यमंत्री महोदय यांचे 100 दिवसांचे कृती आराखड्या अंतर्गत कार्यालय प्रमुख यांना कामकाजासंबंधी देण्यात आलेल्या लक्षाच्या अनुषंगाने सदर मुद्देमालाची निर्गती करण्यात आली आहे.
पोलीस ठाणे आंबी येथे सन 2012 मध्ये 1) गुरनं 12/2012 कलम 65(ई) म.दा.का, 2) गुरनं 27/2012 कलम 307 भा.दं.वि. सहकलम 65 (ई)म.दा.का. तसेच सन 2017 मध्ये गुरनं 130/2017 कलम 65(ई) म.दा.का. प्रमाणे गुन्हे दाखल होते. सदर गुन्ह्यात पोलीसांनी विविध कंपन्यांची एकुण 5,98,699 किंमतीची देशी विदेशी दारु जप्त केली होती. सदर गुन्ह्याचा मा. न्यायालयात निकाल लागला असुन मा. न्यायालयाने दारु मुद्देमाल प्रचलित नियमानुसार नाश करण्याबाबत आदेश केले होते. त्याच्या आधारे पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी भुम गौरीप्रसाद हिरेमठ, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे आंबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गोरक्ष खरड यांनी मा. जिल्हाधिकारी धाराशिव व मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करुन सदर दारु मुद्देमाल नाश करण्याची परवानगी प्राप्त करुन घेवून दिनांक 19.03.2025 रोजी पोलीस स्टेशन आंबी येथे निरीक्षक बी.बी. हुलगे राज्य उत्पादन शुल्क भुम व दोन पंचाच्या उपस्थितीत जेसीबी मशीनच्या सहाय्याने खड्डा खोदुन त्यात विविध कंपन्यांची महागडी विदेशी व देशी दारु ओतुन नाश करण्यात आली.