भूम (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि करिअर कट्टा विभागीय पुरस्कार वितरण सोहळा 2025 दिनांक 18 मार्च रोजी देवगिरी महाविद्यालय (स्वायत्त), छ. संभाजीनगर येथे संपन्न झाला. यावेळी शंकरराव पाटील महाविद्यालयासाठी उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय-द्वितीय पुरस्कार, उत्कृष्ट जिल्हास्तरीय प्राचार्य - प्रथम पुरस्कार मा. प्राचार्य डॉ. एस. श्री. चंदनशिव, उत्कृष्ट जिल्हास्तरीय तालुका समन्वयक - द्वितीय पुरस्कार मा. प्रा. डॉ. मंगेश खराटे, उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालयीन समन्वयक - तृतीय पुरस्कार मा. प्रा. डॉ. राजश्री तावरे, सन 2024 मध्ये सहविभागीय समन्वयक म्हणून यशस्वीरित्या कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल सन्मान डॉ. नितिन पडवळ यांचा करण्यात आला, सन 2024 मध्ये जिल्हा समन्वयक म्हणून यशस्वीरित्या कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल प्रा. पूनम सुतार यांचा सन्मान करण्यात आला तसेच तालुका समन्वयक म्हणून प्रा. कऱ्हाळे सर यांच्या नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला तर महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची नियुक्ती जिल्हास्तरीय विद्यार्थी संसदेसाठी करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या सर्व सन्मानासाठी विद्या विकास मंडळ पाथरुडचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. डी. व्ही. शिंदे, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी बोराडे, आयक्युएसी समन्वयक डॉ. अनुराधा जगदाळे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. किशोर गव्हाणे, प्रा. गौतम तिजारे, प्रा. डॉ. अशोक दुनघव, डॉ. गोकुळ सुरवसे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आदींनी कौतुक केले.