धाराशिव (प्रतिनिधी)- 200 किलो अल्युमिनियम धातुच्या तारा चोरणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील चोरीला गेलेल्या माला संदर्भात व पाहिजे असलेल्या गुन्हेगारासंदर्भात तपास करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, तार चोरणारे आरोपी नामे हणुमंत रामा बोडके रा. शासकीय दुध डेअरी बाजूला साठे चौक धाराशिव ता. जि. धाराशिव, निखील राजेंद्र मंजुळे रा. शिवाजी महाराज चौक वडार गल्ली धाराशिव, आरविंद बाबा क्षिरसागर, रा. साठे नगर धाराशिव यांनी मिळून केला असुन ते बेंबळी रोडला थांबले आहेत.
अशी माहिती मिळाल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला असता वरील आरोपी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे चोरीच्या गुन्ह्या बाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्यांनी सांगितले शिंदे कॉलेज जवळ वरुडा रोडच्या जवळ असलेल्या एका गोडावून येथुन चोरी केल्याची कुबूली दिली. त्यावर पथकाने नमुद आरोपीचे ताब्यातुन अल्युमिनियम 55 एमएम धातुच्या ताराचे बंडल अंदाजे 200 किलो वजनाच्या तारा, एक पांढऱ्या रंगाचे पिकअप क्र एमएच 25 पी 3808, बुलेट मोटरसायकल क्र एमएच 25 बीबी 0002 व यामाहा मोटरसायकल क्र एमएच 25 बीडी 1165 असा एकुण 12 लाख 70 हजार रूपये किंमतीचा माल जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह 3 आरोपीस आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोहेकॉ- विनोद जानराव, समाधान वाघमारे, पोना नितीन जाधवर, बबन जाधवर, पोहेकॉ चालक महेबुब अरब, पोलिस अंमलदार विनायक दहीहंडे, प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली आहे.