तुळजापूर (प्रतिनिधी)-  शिवबाराजे प्रतिष्ठाण वतीने शुक्रवार दि. 28 मार्च रोजी धाराशिव रोड शिवारात घेण्यात आलेल्या  मराठवाडा केसरी श्रीतुळजाभवानी चषक भव्य बैलगाडा स्पर्धत नंदकिशोर प्रसन्न शेठ, संग्राम मनोज राऊत माळशिरस प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकावर सिद्धेश्वर ग्रुप तोळनूर चनवीर गुड्डेवाडी तर तृतीय स्थानी  राजकुमार बाळा गायके मित्र मंडळ आंबेजोगाई यांची बैलजोडी राहिली. तसेच चौय्था  क्रमांकावर  जय हनुमान प्रसन्न नगराध्यक्ष आकाश काका सिद माळशिरस, पाचव्या स्थानी संत बाळूमामा प्रसन्न अश्टे मोहळ, आई तुळजा भवानी प्रसन्न  नागेश लोखंडे धाराशिव, सहाव्या स्थानी समर्थ दादा पाटील करोळे पंढरपूर, सातव्या स्थानी आई  येडेश्वरी प्रसन्न वानेवाडी हौश्या गरुडा ग्रुप वानेवडी धाराशिव यांची बैलजोडी राहिला.

या स्पर्धसाठी जवळपास180 बैलजोडा स्पर्धक सहभागी झाले होते. बैलगाडी स्पर्धतील प्रथम विजेत्या संघास रोख 51 हजार रुपये व मराठवाडा केसरी श्रीतुळजाभवानी चषक आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम, गदा देण्यात आले. व्दितीय विजेत्या संघास 31 हजार, तृतीय क्रमांक 21 हजार रुपये चषक, चतुर्थे 11 हजार रुपये, पाचवा क्रमांक 7 हजार, सहावा क्रमांक 5 हजार रुपये असे बक्षिसे गदा देवुन गौरविण्यात आले.

या स्पर्धसाठी महंत तुकोजी बुवा, खासदार ओमराजे निंबाळकर,  आमदार कैलास पाटील सह अनेकांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी अर्जुन साळुंके, विकी वाघमारे, चेतन शिंदे, दीपक निकम सह त्यांचा सहकाऱ्यांनी परिश्रम  घेतले.

 
Top