तुळजापूर (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार दि. 29 मार्च रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे येवुन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींजींची विधिवत पुजा करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर प्रशासनाच्यावतीने गाभाऱ्यामध्ये कवड्याची माळ घालून स्वागत केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी श्रीकल्लोळ तिर्थकुंड होमकुंड, पिंपळपार तसेच मंदीर गर्भगृह, सिंह, भवानी शंकर मंडपची पाहणी केली. नंतर छञपती शिवाजी महाराज दरवाजा येथे जावुन तेथील संभाव्य विकास कामांची पाहणी केली. यावेळी  त्यांना सविस्तर  महंत तुकोजी बुवा, आमदार राणाजगजितसिंह पाटील व पुरातत्व विभागाचा अधिकारी वर्गाने माहिती दिली. यावेळी त्यांनी भवानी शंकर मंडपातील तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार व ऐतिहासिक स्तंभ कलाकृतीचे अनावरण केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत मित्राचे उपाध्यक्ष तथा मंदिरचे विश्वस्त तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी,विभागीय आयुक्त दिलीप गावडे,विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील,धाराशिव उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड, तुळजापूर मंदिर संस्थानचे व्यवस्थापक अरविंद बोळंगे उपस्थित होते.


विकास आराखड्याची घेतली माहिती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंदिर परिसरात पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या कामांची तसेच मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराची पाहणी केली. पाहणीनंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात तुळजापूर विकास आराखड्याचे सादरीकरण पाहून त्याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी शाल,श्रीफळ व देवींजींची प्रतिमा देऊन सत्कार केला.

 
Top