तुळजापूर (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन सातबारा कोरा कधी करणार यासह अन्य मागण्यासाठी केंद्रातील व राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात सोमवार दि. 3 मार्च रोजी काँग्रेस पक्षाने शहरातुन ट्रॅक्टर (रॅली) मोर्चा काढुन आंदोलन केले.
प्रथमता काँग्रेस जिल्हाअध्यक्ष अँड धिरज पाटील यांच्या संपर्क कार्यालयापासुन या टँक्टर रँलीस आरंभ झाला. यात तालुकाध्यक्ष रामचंद्र आलुरे, युवा नेते अमित कुतवळ सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात मोठ्या संखेने सहभागी झाले होते. सदरील ट्रँक्टर मोर्चा शहराचा प्रमुख भागातुन काढण्यात येवुन याचा सांगता तहसिल कार्यालय येथे झाला.
यावेळी बोलताना धिरज पाटील म्हणाले कि, विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने कर्जमाफी सारखे अनेक आश्वासन दिली परंतु प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर विसर पडलेला दिसत आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार होते त्याचे काय झाले? मागेल त्याला सौर पंप अनेक शेतकऱ्यांनी नोंदी केल्या प्रत्क्षात अजुन एकालाही मिळाला नाही .यासाठी शेतकऱ्यांनी पैसे भरले आम्ही केलेल्या मागण्या बाबतीत शासनाने विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इषारा पाटील यांनी यावेळी दिला. यावेळी काँग्रेस आजी माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज संस्थाचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सर्व फ्रंटल, सेलचे जिल्हा, तालुका अध्यक्ष, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित कार्यकते उपस्थितीत होते.