मुरुम ( प्रतिनिधी)- उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील कॅडेट अर्जुन पाचंगे याची 'संबळ' या कला प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या 26 जानेवारी 2026 रोजी झालेल्या गणतंत्र दिवस परेडसाठी महाराष्ट्राच्या संघात त्याची निवड झाली होती . तसेच भारताच्या संघात सांस्कृतिक वादन आणि गीत या प्रकारात अंतरराष्ट्रीय पातळीवर YEP म्हणजेच युथ एक्सचेंज प्रोग्राम साठी त्याच्यासाठी पण निवड झाली आहे.अर्जुन पाचंगे चा 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर चे कमान अधिकारी कर्नल संतोष नवगण व कर्नल वाय बी सिंह तसेच कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी त्याचा सत्कार केला . शुभेच्छा प्रसंगी कर्नल संतोषजी नवगन सर यांनी कॅडेट्सने एनसीसी मध्ये आपले भवितव्य घडवावे व देशाची, समाजाची सेवा करावी .कैडेट्सनी या तीन वर्षांमध्ये वेळ न घालवता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक चांगला अधिकारी म्हणून आपले ध्येय पूर्ण करावे असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. सध्या स्पर्धेचे युग आहे स्पर्धेत आपले स्थान मजबूत करावयाचे असतील तर कॅडेट्सना अष्टपैलू व्यक्तिमत्व बनवून आपले स्थान निश्चित करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. या सत्कार समारंभा वेळी ॲडम ऑफिसर कर्नल वाय बी सिंह कैप्टन डॉ चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर , बाजीराव पाटील , संजय चिकने , आर्मी स्टाफ, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते 

 
Top