भूम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषदे कडून मार्च 2021 ते मार्च 2025 प्रशासक काळात घनकचरा व्यवस्थापन मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून याची उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी करून दोषी वर गुन्हे दाखल करावेत अन्यथा भूम नगर परिषद परिसरात 3 एप्रिल रोजी आत्मदहन करणार असल्याबाबत आबासाहेब मस्कर व चंद्रमणी गायकवाड यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन दिले आहे.
भूम नगर परिषदेवर 2021 पासून मुख्याधिकारी प्रशासक म्हूणन कारभार पाहत आहेत. या कार्यकाळात भूम शहरातील स्वच्छते साठी ऑनलाईन घनकचरा व्यवस्थापन निविदा मागवून त्यातील पात्र संस्थेला एक वर्षासाठी काम दिले जाते. मात्र 2021 पासून शहरातील ठराविक संस्थेला संगनमत करून प्रशासक काम देत आहेत. घनकचरा निविदा एक कोटी 40 लाख रुपये असताना मात्र गेल्या 2 वर्षांपासून शहरात सफाई फक्त नावालाच केली जाते. महिन्यातून एक दिवस कंत्राटी सफाई कर्मचारी सफाई करताना जी.ओ. टॅग चे फोटो काढून पाठवले जातात. प्रत्यक्षात सफाई मात्र होत नाही. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहें. भूम नगर परिषदेने निविदा देताना खालील नियम व अटी दिल्या आहेत. मंजूर निविदा धारकाद्वारे न. प. स पुरवण्यात येणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन फोटो, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड व क्र हे कार्यालयास देणे बंधनकारक आहे. मंजूर निधी धारकांचे अधीपत्याखाली कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन हे राष्ट्रीय कृत बँकेकडून अदा करणे बंधनकारक आहे. मंजूर निविदा धारकांचे आधी पत्त्याखालील कंत्राटी कामगारांचे किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, प्रॉव्हिडंट फंड व्यवसाय कर इत्यादी बाबींची पूर्तता करण्याची व त्यांचे अभिलेखे जतन करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदार संस्था फर्मची राहील त्याचा मासिक पुरावा या कार्यालयास मासिक देय का सोबत सादर करणे बंधनकारक आहे. निवेदिता मधील सर्व नियम व अटी निविदा धारकास बंधनकारक राहतील अशा अटी असताना मात्र कंत्राटदराने बोगस दाखवले आहे.