कळंब (प्रतिनिधी)- शहरातील नगरपरिषद हद्दीतील सावित्रीबाई फुले शाळा ते स्मशानभूमी ,भीम नगर या भागातील सुरू असलेले नालीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम त्वरित थांबून सदर कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून सदर काम नव्याने करण्यात यावे अशी मागणी अझहर मकसूद सौदागर यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . 

निवेदनात म्हटले आहे की कळंब नगर परिषदेच्या हद्दीतील सावित्रीबाई फुले शाळा ते स्मशानभूमी व भीम नगर कळंब शहरातील इतरत्र रस्त्याच्या दोन्ही बाजूने सिमेंट नाली बांधकाम सुरू असून हे बांधकाम एका कंत्राटामार्फत सुरू केले आहे . सदर नाली बांधताना लोखंडी सळ्या या मापदंडाप्रमाणे न वापरता कंत्राटदाराने यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्यामुळे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची रीतशीर चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व या कामाची चौकशी करून हे काम पुन्हा नव्याने सुरू करावे. अशी मागणी अझर सौदागर यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनामुळे कंत्राट दारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या कामाची पुढे चौकशी होणार का असा प्रश्नही जनतेतून उपस्थित केला जात आहे.


 
Top