धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व रत्नागिरी जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने डेरवण येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या धनुर्धरानी 1 सांघिक रौप्य, 1 सांघिक कास्य व 2 वैयक्तिक कास्य पदक पटकाविले आहे.
कंपाउंड राउंड प्रकारात 15 वर्ष वयोगटातून परीस पाटील, श्रवण जमादार, अभिनव जानराव आणि आर्यन खरड यांनी सांघिक रौप्य पदक, 10 वर्ष वयोगटातून मल्हार काकडे, स्वराज जाधव, स्वराज काकडे यांनी सांघिक कांस्य पदक तर वैयक्तिक एलिमिनेशन राउंड मध्ये 15 वर्ष वयोगटातून परीस पाटील याने व 13 वर्ष वयोगटातून आर्यन खरड याने कास्यपदक पटकाविले आहे. सदरील खेळाडूंना धाराशिव जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, कोच कैलास लांडगे व आदित्य काळे यांचे मार्गदर्शनाखाली डायट कॉलेज येथील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रात नियमित सराव करत आहेत.