धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त प्रसेना प्रतिष्ठान आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी महादेव भोसले तर सचिवपदी मोहन मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रविवार, 2 मार्च रोजी शासकीय विश्रामगृहात प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वांच्या विचारविनिमयाने जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी महादेव भोसले, उपाध्यक्षपदी उत्कर्ष माने, सचिव मोहन मुंडे, सहसचिव निहार गायकवाड, कोषाध्यक्ष प्रज्योत बनसोडे, निलेश चिलवंत, सांस्कृतिक प्रमुख राज कसबे, धन्यकुमार क्षीरसागर, शाहूराव धावारे, सुनिल क्षीरसागर, विशाल बनसोडे, छोटू वाघमारे, निवडणूक प्रमुख बाळासाहेब सरवदे, मोहसीन पठाण, सचिन डोंगरे, गणेश पेठे, शैलेंद्र शिंगाडे, संयोजक किशोर बनसोडे, प्रमोद हावळे, नागराज साबळे तर सल्लागार म्हणून कमलाकर बनसोडे, अनंत विधाते, अरूण बनसोडे, रवी बनसोडे यांची निवड करण्यात आली. यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमोद हावळे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी मार्गदर्शक कुमार ओव्हाळ, दादासाहेब मोटेे, जीवन भालशंकर, रोहीत नाईकवाडी, बंटी सरवदे, चेतन माळाळे, दीपक गायकवाड, रूपेश बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, निखिल सिरसाटे उपस्थित होते.

 
Top