उमरगा (प्रतिनिधी)-  पक्ष संघटना अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी, राज्यातील प्रत्येक गावखेडयांतील कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेना पक्षाचे विचार पोहचविण्यासाठी  शिवसैनिकांनी पुन्हा नव्याने कामाला लागावे. असे आवाहन प्रा.रविंद्र गायकवाड यांनी केले आहे. “शिवकार्य” शिवसेना सभासद नोंदी अभियानांतर्गत सोमवार दि.3 रोजी उमरगा शहरातील श्री.मंगल कार्यालय येथे तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व  शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सध्या राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. शिवसेना पक्षाचे विचार घरोघरी पोहचविण्याची जबाबदारी शिवसैनिक म्हणुन आपली आहे. शिवसैनिकांनी या अभियानाच्या माध्यमातुन जनतेला महायुती सरकारने राबविलेल्या अनेक लोकोपयोगी योजनांची माहिती द्यावी तसेच त्यांच्या समस्या जाणुन घ्याव्यात. व तालुक्यातुन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून हे अभियान यशस्वी करावे असे युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांनी यावेळी सांगितले. 

कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, उपतालुकाप्रमुख नरेंद्र माने, माजी नगराध्यक्ष धनंजय मुसांडे, सिद्रामप्पा चिंचोळे, विलास भगत, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, विधानसभा संघटक शरद पवार, शहरप्रमुख योगेश तपसाळे, युवा सेना तालुकाप्रमुख विनोद कोराळे, शहरप्रमुख अमर शिंदे, उपसभापती विजय माने, अशोक इंगळे, शेखर मुदकण्णा, सुरेश मंगरूळे,  राजेंद्र शिंदे, चंद्रशेखर सुर्यवंशी, व्यंकट पाटील, शेखर घंटे, हणमंत गुरव, भगत माळी, खयुम चाकुरे, नाना मदनसुरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिवसैनिकांचे सदस्य नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप जगताप व आभार प्रदर्शन चंद्रशेखर सूर्यवंशी यांनी केले.


 
Top