भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले चार दरोडेखोर ग्रामस्थांनी रंगेहात पकडून भूम पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन दरोडेखोर फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
ग्रामसुरक्षा यंत्रणेची तत्परता; दरोडेखोरांना गावकऱ्यांचा पाडाव
पाटसांगवी गावात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी 'ग्रामसुरक्षा यंत्रणा' व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे विशेष सतर्कता ठेवली होती. 22 मार्च रोजी रात्री 9:30 च्या सुमारास काही संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळून आल्या. नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकली पाहून ग्रामस्थांना संशय आला आणि त्यांनी त्वरित ग्रामसुरक्षा ग्रुपमध्ये माहिती दिली. गावकऱ्यांनी एकत्र येत संशयित दरोडेखोरांचा पाठलाग केला. पाटसांगवीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना चिंचपूर ढगे गावच्या हद्दीत पकडण्यात यश आले. लगेचच भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना कळवण्यात आले.
चार आरोपी अटकेत, दोन फरार भूम पोलिसांनी घटनास्थळी तातडीने दाखल होत चार दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्रे आणि दोन नंबर नसलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. अटकेत असलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे सदा गोरख भोसले (वय 44), राहणार हाजीपूर, ता. आष्टी, जि. बीड,अमोल हैवान काळे (वय 23), राहणार चिखली, ता. आष्टी, जि. बीड,नितीन जिजाबा भोसले (वय 28), राहणार चिखली, ता. आष्टी, जि. बीड,जयदेव हिलामती भोसले (वय 45), राहणार पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड
दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून सहा जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310 (4), 310 (5) दि.23 रोजी आज 6.48 मिनिटांनी गुन्हा दाखल झाला . पोलीस तपास जोरात सुरू , या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, पीएसआय शशिकांत तवार, पीएसआय अख्तर सय्यद, पीएसआय संजय झराड, तसेच पोलीस अजित कवडे, देवकर आणि यादव हे तपासात सहभागी आहेत.
रात्री उशिरापर्यंत आरोपींची कसून चौकशी सुरू होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास पीएसआय शशिकांत तवार,करत आहेत. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा टळल्याचे पोलिसांनी सांगितले.