तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मंदीरसंस्थान ट्रस्ट संचलित श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयास नँकने बी प्लस नामांकन मिळाल्याची  माहीती प्राचार्य आर. एच. आडेकर  यांनी पञकार परिषद घेवुन दिली.

यावेळी पञकारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले कि, श्रीतुळजाभवानीसंस्थान अध्यक्ष तथा जिल्हाअधिकारी तात्कालीन डाँ. सचिन ओम्बासे, विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी विश्वस्त, विश्वस्त तथा तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी यासाठी सहकार्य केले. 20 व 21 फेब्रुवारी 2025 मध्ये आसाम विद्यापीठाचे उपकुलगुरु प्रोफेसर नरेंद्र चौधरी, मिझोराम विद्यापीठ डीन लोरीमाबीम लोलीत कुमार सिंग, आंध्र प्रदेश अम्रतासाई इन्सीट्युटचे प्राचार्य मियुनी शशीधर यांनी पाहणी करुन हे नामांकन दिले. येथे अद्यावात इमारत, सीसीटीव्ही, सुसज्ज  ग्रंथालय, प्रयोग शाळा, अनुभव स्टाँफ, स्काँलरशिप कोआँफरटीव्ह, मेससह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथे सिव्हील एएनटीसी व सीएससी व  मँकनिकल बीएसएच कोर्सेस आहेत. काँलेज कँम्पस  संपुर्ण सीसीटीव्ही कक्षेत आहेत. येथील  कर्मचाऱ्यांचे बरेच प्रश्न मार्गी लावले आहेत. फर्निचर, लँबोरटरी प्रयोगशाळा सुसज्ज आहे. याचे फलित म्हणून नँक चे आम्हाला बी प्लस नामांकन मिळाल्याचे शेवटी सांगितल यावेळी उपप्राचार्य आर. जी. मुदकण्णा, डाँ. डी. डी. खुमणे, डी. व्ही, शिंदे, प्रा सचिन काळे, प्रा विवेक गंगणे, प्रा संतोष ऐकदंते उपस्थितीत होते.


 
Top