भूम (प्रतिनिधी)- जवळा नि.येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्यावतीने समग्र ग्रामविकास प्रकल्पांतर्गत महिला मेळावा घेण्यात आला. यासाठी 650 ते 700 महिला उपस्थीत होत्या. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजन करून करण्यात आले. 

कार्यक्रमस्थळी महीलांनी विविध विविध स्टॉल लावले होते. त्याला भेटी देऊन माहीती घेतली.  तद्नंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकल्प व्यवस्थापक कांतीलाल गिते यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात संस्थेची धाराशिव जिल्ह्यातील आजवरची वाटचाल आणि केलेल्या कामाचा आढावा सांगितला. प्रमुख पाहुणे तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे  यांनी उपस्थित  महिलांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.  उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. डी. गुडूप  यांनी उपस्थित महिलाना मार्गदर्शन करून विविध योजनाविषयी माहिती दिली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात चैतन्य गोखले साहेब जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड यांनी उपस्थित महिलावर्गाला उपजीविका निर्मीती बाबत मार्गदर्शन करत स्वावलंबी होण्याबरोबर आरोग्याची काळजी घेणे. गाव विकासासाठी आणि राष्ट्र उभारणीत  वॉटरच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले. जवळा निजाम गावच्या सरपंच शितल वाघमारे यांनी वॉटरच्या कामाचे कौतुक करत भविष्यात आपण आणि ग्रामस्थ सहकार्य करू याची ग्वाही देत महिला वर्गाला या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. यानंतर वसुंधरा सेविका यांनी आपले मनोगत व्यक्त करत वॉटरच्या संपर्कात आल्यावर आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात कसा बदल झाला, आपली वेगळी ओळख कशी निर्माण झाली हे सांगितले. 

यानंतर संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी समिना पठाण यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. परस बागेमध्ये तयार होणारा भाजीपाला त्या पासुन वेगवेगळे अन्नपदार्थ बनवीले होते. त्याचे नंबर काढून महीलाना सन्मानीत करण्यात आले. त्या सोबत समग्र ग्राम विकास प्रकल्पा मध्ये चांगले काम करणारा वसुंधरा सेविका यांचे तीन नंबर काढले. प्रथम क्रमांक सौ. सुरेखा रविद्र लोमटे, दुसरा नंबर सौ. सोनाली इंगळे तिसरा नंबर सौ. सविता चव्हाण यांनी गाव पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांतीलाल गिते यांनी केले तर आभार प्रर्दशन समिना पठाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वॉटर संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सुंधरा सेवक, सेविका, परिर्वक भागीदार, रणरागीनी ग्रामविकास समीती जवळा नि व ग्रामपंचायत जवळा निजाम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमा मध्ये नलावडे कलापथ यांनी महिला सक्षिमीकरण, 0 ते 5 वर्ष मुलाची काळजी, गरोधर व स्थनदा माता या बदल आपला कार्यकमातुन प्रभोधन केले सुत्र संचालन निता देव मॅडम यांनी केले

 
Top